संस्थेमार्फत क्रिकेट कुस्ती कबड्डी खो-खो हॉलीबॉल ऍथलेटिक्स कराटे बॅडमिंटन तलवारबाजी स्थानिक ग्रामीण खेळ इत्यादी असे विविध खेळांचे प्रशिक्षण देणे खेळाबद्दल माहिती देणे व पुरविणे तसेच खेळाच्या विविध कार्यक्रमांचा समन्वय साधणे
या संस्थेमार्फत तरुणांमध्ये खेळाची आवड निर्माण होण्यासाठी खेळांची शिबिरे आयोजित करणे विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करणे त्यामध्ये विजयी झालेल्या खेळाडूंचा यथोचित गौरव करणे व त्यांना प्रोत्साहन देणे
मुला मुलींचे शारीरिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी कबड्डी कुस्ती क्रिकेट कॅरम खो-खो कराटे यासारख्या खेळांचे प्रशिक्षण देणे तसेच विविध प्रकारच्या खेळांच्या स्पर्धा आयोजित करणे
संस्थेमार्फत तरुण-तरुणींना शारीरिकदृष्ट्या सुदृढ व निरोगी राखण्यासाठी व्यायामशाळा बांधणे शास्त्रोक्त पद्धतीने व्यायामाचे शिक्षण देणे व्यायाम प्रकारांच्या खेळांच्या कलेचा स्पर्धा भरवून प्रोत्साहन देणे व कलागुणांना वाव देणे.