संस्थेमार्फत परिसरातील गरीब व गरजू मुला-मुलीं करता अंगणवाडी बालवाडी मार्गदर्शन केंद्र प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक विद्यालय महाविद्यालय मेडिकल महाविद्यालय डीएड बीएड महाविद्यालय तांत्रिक विद्यालय कला केंद्र संगणक प्रशिक्षण देणे तंत्रनिकेतन असे विविध शैक्षणिक उपक्रम चालविणे तसेच शाळांना खिचडी व इतर अल्पोपहार वाटप करणे.
शैक्षणिक दृष्ट्या उन्नतीसाठी सार्वजनिक वाचनालय अभ्यासक्रम केंद्र ग्रंथालय कल्याण केंद्र व संगीतालय इत्यादी स्थापन करणे व चालविणे कार्यशाळा निर्माण करणे.
संस्थेमार्फत शिक्षणापासून वंचित असणाऱ्या आदिवासी क्षेत्रात शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आदिवासी भागात शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करणे.
संस्थेमार्फत गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी शिष्यवृत्ती वह्या पुस्तके लेखन सामग्री गणवेश वगैरे देऊन शैक्षणिक दृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांना योग्य ती वैद्यकीय मदत करणे. हुशार विद्यार्थ्यांना सत्कार करणे व त्यांना शैक्षणिक मदत करणे.