
महानगर टेलिफोन निगम कामगार संघाच्या मार्फत अनेक प्रकारचे उपक्रम गत अनेक दशके राबविले जातात, परंतु याच उपक्रमांना अधिक मुर्त स्वरुप द्यावे म्हणून संघटनेच्या माध्यमातून जी थोडी पुंजी यूनियन कडे जमा झाली होती. त्या पुंजीच्या आधारे अरविंद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली एक ट्र्स्ट स्थापन केला. त्याचे नाव जाणीव!
खासदार – माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांची समाजसेवेची अचंबित करणारी वाटचाल सर्वांनाच सुपरिचित आहे. अरविंद सावंत यांच्या या समाजकारणात त्यांना महानगर टेलिफोन निगम लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांची साथ कायम असते. खरं तर ते सर्व अरविंद सावंत यांना पालकच समजतात. त्यांच्या समर्थ अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या या न्यासास निव्वळ जाणीव नाव देऊन ते थांबले नाहीत तर पुढे ब्रीदवाक्य लिहिले “जाणीव, मुळांची आणि मूल्यांची” !! त्यांच्या मते समाजातील प्रत्येकाने आपले मूळ विसरु नये, आणि त्या मुळाशी असलेली बांधिलकीही आणि त्या मूळ विचारधारणेला वर्धिष्णू करताना ‘मूल्ये’ खरं तर जीवन मूल्येही विसरु नये, असे त्यांचे म्हणणे!!!