संस्थेमार्फत कला-संस्कृती शिक्षण समाज कार्य सेवा इत्यादी माध्यमातून भावनिक एकात्मता बनविण्याकरिता प्रयत्नशील राहणे
संस्थेमार्फत नृत्य संगीत इत्यादी कलेची आवड निर्माण करण्यासाठी नृत्य-संगीत इत्यादी कलेचे प्रशिक्षण देणे त्यातून कलेचे प्रबोधनपर कार्यक्रम राबविणे
संस्थेमार्फत कलाक्षेत्रातील कलाकारांचा गुणगौरव करणे त्यांच्या कलागुणांना वाव मिळवून देणे यासाठी प्रयत्न करणे
संस्थेमार्फत कलेचे विविध कार्यक्रम आयोजित करून भारतीय संस्कृतीचे जतन करणे कलाकारांचा सत्कार करणे
संस्थेमार्फत आर्थिक दुर्बल कलाकार व्यक्ती सामाजिक घटक यांना मदत कार्यक्रम आणि संस्थात्मक योजनांची सुरुवात करणे
संस्थेमार्फत अहिंसा शांती विकास आणि एकता या विचाराचा राम मध्ये आणण्यासाठी क्रियाशील कलाकार स्वयंसेवकासाठी एक व्यासपीठ निर्माण करणे
संस्थेमार्फत कला आणि संस्कृती क्षेत्रात नव्या कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे स्पर्धात्मक महोत्सवाचे आयोजन करणे व नवीन कलाकृतीचे निर्माण करून भारतात व परदेशात सांस्कृतिक आदान-प्रदान करणे